municipalofficerbeatenbyoneinkaradmunicipalpremises

esahas.com

कराड नगरपालिका आवारात एकाकडून पालिका अधिकाऱ्यास मारहाण

येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.