municipalcorporationremovedencroachmentsatshahuchowk

esahas.com

शाहू चौकातील अतिक्रमणे पालिकेने हटवली

सातारा पालिकेने शाहू चौकातील अजिंक्य मटण शॉप बगाडे हॉस्पिटल या दरम्यानची अतिक्रमणे हटवली. अतिक्रमण मोहिमेदरम्यान टपरीधारक आणि पालिकेचे कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र अतिक्रमण विभागाने कोणालाही न जुमानता धडक कारवाई केल्याने शाहू चौक ते महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला.

esahas.com

सातारा पालिकेच्या घंटागाड्या निघाल्या भंगारात

अवघ्या चार वर्षांपूर्वी सातारा पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या पुरेशा देखभालीअभावी भंगारमध्ये निघू लागल्या आहेत. पालिकेच्या हुतात्मा उद्यान येथे या गाड्या अतिशय नादुरुस्त अवस्थेत उभ्या असून काही घंटागाड्यांच्या बॅटर्‍या चोरीला गेल्याने या गाड्या म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

esahas.com

मलकापूर पालिकेचे अंदाजपत्रक कोणत्याही करवाढीशिवावाय मंजूर

मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

esahas.com

कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे

विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

esahas.com

कराड पालिका पदाधिकारी दिव्यांग बांधवांचा प्रश्न सोडवणार का?

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीबाबत यापूर्वी दि.3 ऑगस्ट रोजी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना पत्र देण्यात आले होते, त्यावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट रोजी चे पत्र आम्हाला देण्यात आले.