maujemalakolanepatharpunjvillagersnoncooperationmovementfrom11

esahas.com

मौजेमळा, कोळणे पाथरपुंज ग्रामस्थांचे 11 पासून असहकार आंदोलन

मौजेमळा, कोळणे व पाथरपुंज येथील 325 खातेदारांचे पुनर्वसनं गेल्या छत्तीस वर्षापासून चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमुळे करण्यात आलेले नाही. राज्य शासनाने हा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आम्ही या क्षेत्रातील वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक करून असहकार आंदोलनं करू, असा इशारा पुनर्वसन कृती संघर्ष समितीचे समन्वयक संजय यशवंत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.