massmarathonorganizedinsataraon2ndoctober

esahas.com

साताऱ्यात 2 ऑक्टोबर रोजी मास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.