‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!