mahiladin

esahas.com

नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो

‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यात मुलांना कोठेही जाण्याचे फिरण्याचे बंद असल्याने त्यांचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य सुरळीत करण्यास नृत्य किती फायदेशीर आहे. नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होत असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींनी नृत्य केल्यास आपले स्वास्थ्य निरोगी राण्यासाठी मदत होईल,’ असे मत यावेळी अभिनेता दिग्दर्शक महेश सोनावणे यांनी व्यक्त केले.

esahas.com

महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासला

‘महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा उंचावलेला आहे. व्यवस्थापनातील एमबीएची पदवी घेऊनही जेवढे व्यवस्थापन कौशल्य येणार नाही त्यापेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थापनाचे कार्य महिला नियमितपणे लिलया करीत असतात. महिलांच्या रोजच्या अतुलनीय कामकाजाची दखल कोठेही घेतली जात नाही. वास्तविक, महिलांना रोजच्या दैनंदिन कामकाजात सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. यातूनच महिलांना प्रोत्साहन मिळण्याबरोबर समाजात चांगला संदेश जाईल,’असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सातारचे

esahas.com

अंजली खाडे यांचा महिला दिनी विशेष सन्मान

माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला.

esahas.com

‘जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन’तर्फे महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. जोतिराम गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकरी व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या शेतकरी व उद्योजक महिला स्वतः खंबीरपणे पुढे येऊन स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र कष्ट करीत असतात, अशा महिलांना सक्षम महिला सन्मान हा पुरस्कार स्व. जोतिराव गोविंदराव लाड फाउंडेशन आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

esahas.com

‘कृषी पदवीधर युवाशक्ती संघटने’तर्फे महिला दिनी महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या भगिनींचा पुष्पगुच्छ, रोपे तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.

esahas.com

कोळकीच्या बहीण-भावंडांनी चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहीण-भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.

esahas.com

फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

esahas.com

महिला सबलीकरणासाठी सक्षम स्त्रीवर्गाने पुढे यावे

‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले. 

esahas.com

माण तालुक्यात महिला दिनी महिला शिक्षिकांचा सन्मान

माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला.

esahas.com

महिलांमध्ये जागतिक क्रांती घडवण्याची ताकद

‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्‍वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला. 

esahas.com

निढळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

esahas.com

‘तेजस्वी’ची ‘पॅरा मिलिटरी’त उत्तुंग भरारी...!

‘ती’ सध्या काय करते?, असा प्रश्‍न आता विचारायची गरज नाही. कारण, शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर अन् महिलांना ती दारे खुली झाल्यापासून ‘ती’ आता सक्षम झालीय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतेय. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलीही यात कुठे मागे दिसत नाहीत. अन् याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांबवडेच्या ‘तेजस्वी’नं ‘पॅरा मिलिटरी’त पहिल्याच प्रयत्नात मारलेली उत्तुंग भरारी...त्याच ‘तेजस्वी’च्या कहाणीचा आज 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त घेतलेला हा अ