maharudra

esahas.com

उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी : महारुद्र तिकुंडे

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असूनही विकासाच्या दृष्टीने मागे पाडू लागला आहे. जिल्ह्यामध्ये कोणतेही मोठे उद्योगधंदे निर्माण होत नाहीत त्यामुळे स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना इतर जिल्ह्यांचा रोजगारासाठी आश्रय घ्यावा लागत आहे.

esahas.com

भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी करुनही जिल्हाधिकारी सर्वोत्कृष्ट कसे ?

राज्य सरकारने कोरोना काळात चांगले काम केले म्हणून राज्यातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत. यामध्ये सातारचे जिल्हाधिकारी यांना देखील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर केलेला आहे. मात्र, मी राज्य शासन व आयुक्तांकडे कोरोना काळात प्रशासनात झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप पुराव्यानिशी करुन देखील त्यांना हा पुरस्कार कसा जाहीर झाला आहे असा माझा सवाल असून राज्य शासनाने हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.

esahas.com

सामाजिकआणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. महारुद्र तिकुंडे यांचे ऑफिसची रेकी ..

सामाजिक व माहीती अधिकार कार्यात काम करणाऱ्या महारुद्र तिकुंडे  यांच्यासारखे लोकांची रेकी होणे हे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे लक्षण असून मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधीतांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे  डॉ. दाभोलकर, पानसरे यांनी केलेल्या निवेदनाचा पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर असा घातपात झाला नस्ताआता पण प्रशासनाने या निवेदनास गांभीर्याने घेणेची गरज आहे.

esahas.com

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात महारुद्र तिकुंडे यांचा 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

आपण केलेल्या न्याय्य मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनांसंदर्भात प्रशासनाने डोळेझाक केल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार संस्थापक- अध्यक्ष, युवा राज्य फाऊंडेशन महाराष्ट्र चे महारुद्र तिकुंडे यांनी दिला आहे.

esahas.com

जिल्हाधिकार्‍यांच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम पुढील असंख्य पिढ्या भोगणार : महारुद्र तिकुंडे

मोठ्या कष्टाने उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सन 2017 साली निर्माण झाले. मात्र त्यानंतर या वास्तूचा प्रवास खडतर मार्गातून जात असताना कोविडच्या कालखंडात तो जम्बो कोविड सेंटरमध्ये रुपांतरित झाला. आणि आता तो शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दिशेने सुरु असून ही वास्तू पुन्हा श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयास परत मिळावी, अशा आशयाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली आहे.

esahas.com

खेड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत ठराव बेकायदेशीर : महारुद्र तिकुंडे

खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून  खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली.

esahas.com

महाराष्ट्रात पुकारण्यात आलेला ‘बंद’ म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ : महारुद्र तिकुंडे

संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा नक्की कोणासाठी? याबाबतच्या चर्चांना आता गल्लोगल्ली ऊत आलाय. नक्की कोणाच्या भल्यासाठी हा बंद पुकारण्यात आला? याचे उत्तर सत्ताधार्‍यांनी द्यावे, अशी मागणी युवा राज्य फौंडेशन संघटनेचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.