lawyerassaultedinsatara

esahas.com

सातारा येथे वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा

सोमवारी, दि. १९ रोजी रात्री साडेनऊ वाजता कन्याशाळेच्या पाठीमागील बाजूस 'तू आपला जा',  असे म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुज्जमील शेख, शाहीद बागवान, जहीद बागवान सर्व रा. सोमवार पेठ, सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.