कोयना जलविद्युत टप्पा क्रमांक एक व दोनच्या आपत्कालीन झडप भुयार येथील 62 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत या गळतीचे अन्वेषण करण्यात आले असून ही गळती बंद करण्याच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोयना जलविद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या दंशाचे प्रमाणही कमी आहे. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
महाबळेश्वर, कोयना बॅक वॉटर येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. आगामी काळात या भागातील पर्यटन आणखी वाढावे, या उद्दिष्टाने विकास साधला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांदाटी खोऱ्यातील गावांमध्ये अभयारण्याचे असलेल्या गट नंबरची मोजणी करून नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे रासाठी, गोकुळ व शिवंदेश यांच्यावर पुनर्वसनाचा शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार याप्रश्नी प्रधान सचिव पुनर्वसन यांनी २२ रोजी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे २१ मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
बामणोली, ता. जावली येथील कोयना तथा शिवसागर जलाशय सांबर या वन्यप्राण्याने चक्क पोहत पार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाले. यावेळी जलाशयात बोटीमधून सफर करणाऱ्या पर्यटकांनी आपल्या कॅमेरे, मोबाइलमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद केला. एवढेच नव्हे तर त्या सांबराला कोयना जलाशय पोहत पार करण्यासाठी मदत केली.
कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.
कोयना दूध संघ सहकारातील सर्वात जुना व सहकारी तत्वावर चालणारा पहिला दूध संघ आहे. माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रूपाने संघाला चांगले नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे संघाने अधिकाधिक नेत्रदीपक प्रगती केली आहे.
जुना कोयना पूल येत्या आठ दिवसात हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. यासाठी पुलाची क्षमता तपासण्यासाठी ज्या चाचण्या गरजेच्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत व संबंधित विभागाच्या मिळालेल्या अहवालानुसार जुन्या कोयना पुलावरून ३ ते ५ टन क्षमतेची वाहने जाऊ शकतील इतकी क्षमता आहे व यावरून किमान हलक्या वाहनांची ये-जा होऊ शकेल. तसेच मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट बॅरीकेट लावली जाणार आहेत. - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.
तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल.
कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे