kisanveersugarfactorywillcontestelectionwithmembers:makrandpatil

esahas.com

किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक सभासदांना सोबत घेऊन लढविणार : मकरंद पाटील

किसन वीर यांनी उभारलेला आणि सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे कामगारांचे हित जपण्यासाठी सुरु होणे गरजेचे आहे. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून सर्वांच्या सहकार्याने किसनवीर सातारा साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केला.