journalistmohanmaskarpatildiesofheartattack

esahas.com

पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला.