inaugurationofashwamedhlibraryandlibrarystudy

esahas.com

अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या अभ्यासिकेचे उद्घाटन

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन आवश्यक आहे. नियोजन करण्याची सवय लागली पाहिजे. स्थिर, ठामपणा, भावनावर नियंत्रण आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता आले पाहिजे. संकटांची भीती आपल्याला मारुन टाकते. त्यामुळे स्वतःच्या भावभावनांचे नियोजन हाच यशाचा खरा पासवर्ड असल्याचे मत इतिहास अभ्यासक, सुप्रसिध्द वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.