intheschoolbuildingworth60lakhs

esahas.com

६० लाखाच्या शाळेच्या इमारतीत शिक्षक मात्र इन मिन तिन; खटाव तालुक्यातील गादेवाडी शाळेची परिस्थिती

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे व ते पिल्यावर विद्यार्थी गुरगुल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं जाते. मात्र सर्व सोयींनीयुक्त शाळेची प्रशस्त इमारत असून देखील पुरेशा शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणच मिळत नसेल तर त्यांनी काय करायचे व जाब कोणाला विचारायचे, असा प्रश्न खटावच्या पश्चिमेला असलेल्या गादेवाडीच्या ग्रामस्थांना पडला आहे.