inshahunagarareajaysocialfoundationwillgodoortodoortocollectgarbage

esahas.com

शाहूनगर परिसरामध्ये जय सोशल फाउंडेशन घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार

सातारा पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा अमृत योजनेतील तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. शहराचा हा लौकिक कायम राखण्यासाठी शाहूनगर कार्यक्षेत्रामध्ये उद्योजक सागर भोसले यांचे जय सोशल फाउंडेशन ऐन पावसाळ्यात कामाला लागले आहे. चला शाहूनगर परिसर स्वच्छ ठेवूया हा संदेश घेऊन या फाउंडेशनचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत.