insataratheconstituentpartiesofmahavikasaghadistagedaprotestmarch

esahas.com

साताऱ्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काढला निषेध मोर्चा

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या  निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती.