insataradistrict397stemployeesweresuspendedand95wereterminated

esahas.com

सातारा जिल्ह्यातील 397 एसटी कर्मचारी निलंबित, तर 95 जणांची सेवा समाप्ती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 397 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.