तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे बाधित रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दि. 9 रोजी बुधवारी 3 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला तसेच 46 वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे.
खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन वैद्यकीय व्यावसायिक, एका लहान बालकासह 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेले 23 तर रॅपिड टेस्टचे 12 रुग्ण आहेत. बाधितांमध्ये एक पशुवैद्यकीय, एक बालरोगतज्ज्ञ, तसेच एक वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे.
खटाव तालुक्यात मागील तीन दिवसांत कोरोनाचे 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी सहा रुग्णांचा बळी गेला आहे. निमसोडमधे दोन दिवसांत 10 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा सातारा येथे मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच खटाव तालुक्यात व निमसोडमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रार्श्वभूमीवर 10 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्यात दोन दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजार चांगलेच हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे आणखी दोन लहान बालकांसह एकूण 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांमध्ये वडूज बाजारपेठेतील काही कामगारांचाही समावेश असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.