immediatelyremovethecontroversialsculptureatrajwadabusstand

esahas.com

राजवाडा बसस्थानकावरील वादग्रस्त शिल्प तातडीने हटवा

राजवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांसमवेत असणारे रामदासांचे वादग्रस्त शिल्प प्रशासनाने तातडीने हटवावे अशी मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत शिल्पांची पोलिसांच्या उपस्थितीत उद़घाटने होतातच कशी ? प्रशासनाची या प्रकरणाला फूस आहे काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.