ifyouhavethecourageoverthrowthegovernment:chiefministeruddhavthackeray

esahas.com

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ बऱ्याच काळानंतर धडाडली. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून ठाकरी शैलीत त्यांनी जुना मित्रपक्ष भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. जवळपास तासभर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर खेरी हिंसाचार या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.