husbandandwifebeaten

esahas.com

पती-पत्नीस मारहाण

जनावरे रस्त्याने घेवून जा, असे सांगितले म्हणून सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे पती-पत्नीस मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून कलाबाई बर्गे आणि शिवाजी बर्गे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.