howmanydayswillthearrearscostthemunicipality

esahas.com

थकबाकीदार किती दिवस लावणार पालिकेला चुना!

मालमत्ता व पाणीकरापोटी सातारा पालिकेला तब्बल ४५ कोटींचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यापैकी आजअखेर १० कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातील टॉप टेन थकबाकीदार करच भरत नसल्याने पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. या दहा थकबाकीदारांकडून तब्बल २ कोटी ३४ लाख २९ हजार ८९८ रुपये पालिकेला वसूल करावयाचे आहेत.