highwayblockedinkhandalafordhangarreservation

esahas.com

धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात महामार्ग रोखला; पुणे-साताऱ्याकडे पंधरा किमीच्या रांगा

धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात काल पुणे-बंगळूर महामार्ग रोको करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मागील अडीच तासापासून ठप्प झाली. धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला.