highway

esahas.com

माणसं पण मरुद्या, टोल पण मिळुद्या !

सध्या होणारी टोल वसुली आणि टोल देऊन प्रवासाचे होणारे हाल याच विदारक चित्र

esahas.com

भारतातील प्रमुख नद्या होणार महामार्ग! 20 नव्या जलमार्गांची घोषणा

भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.

esahas.com

महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास!

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारातातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याच महामार्गाला टक्कर देणार देशातील दुसरा मोठा महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.

esahas.com

धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात महामार्ग रोखला; पुणे-साताऱ्याकडे पंधरा किमीच्या रांगा

धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात काल पुणे-बंगळूर महामार्ग रोको करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मागील अडीच तासापासून ठप्प झाली. धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला.

esahas.com

आळंदी -पंढरपूर पालखी महामार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून हवाई पाहणी

महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.

esahas.com

महामार्गावर चेन स्नॅचिंग

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चेन स्नॅचिंग झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

महामार्गावर दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर कारवाई

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.

esahas.com

महामार्गावर गोंधळ घालणाऱ्या युगांडाच्या महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात...!!

प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.

esahas.com

महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आवाहन

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (नविन क्र. 48) पुणे सातारा कि. 725.000 ( शेंद्रे-सातारा) ते 865..350 (देहू रोड जंक्शन) एकूण लांबी 140.35 कि.मी. हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या कक्षेत येतो. या महामार्गालगत खालीलप्रमाणे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

esahas.com

वाठार येथे टायर फुटल्याने टेंपो महामार्गावर पलटी

वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

esahas.com

पालखी महामार्गाचे काम बंद पडल्यास सतीश धुमाळ जबाबदार

आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गासाठी भोगवटादार वर्ग - १ शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई बँकेत जमा केल्यानंतर क्र. १६ चे विशेष भूमी संपादन अधिकारी सतीश धुमाळ आणि त्यांच्या कार्यालयाकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे १० टक्के रक्कम कपातीबाबतचे पत्र बँकेस देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. 

esahas.com

मुंबई-पुणे महामार्गावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.

esahas.com

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; सहाजण गंभीर

पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

esahas.com

पुसेगावमधील महामार्गाचे काम सुरू करा, अन्यथा रस्ता रोको : डॉ. सुरेश जाधव

पुसेगाव : पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंत अनेक दिवसांपासून रखडले आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. पुसेगाव मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा प्रशासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारच्या विरोधात दि. १० फेब्रुवारी रोजी पुसेगाव येथील छ. शि...

esahas.com

महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले...!!

मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे.

esahas.com

वर्धनगड येथील महामार्गाचे काम दीर्घकाळानंतर पूर्णावस्थेकडे

वर्धनगड एसटी स्टॉप परिसरातील व वर्धनगड घाटातील अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम या दोन किलोमीटर अंतरामध्ये अनेक लहान मोठ्या अपघातानंतर मेघा प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांनी सुरू केले असून पंधरा दिवसांमध्ये रस्ता पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

esahas.com

जीव गेलेवरच सतीश धुमाळवर  कारवाई होणार का?

सतीश धुमाळचा पाठीराखा नक्की कोण ? सतीश धुमाळ सारखा भ्रष्ट अधिकारी पुनर्वसन विभागात असताना अनेक कामांत भ्रष्टाचार केला . भूसंपादन विभागात बदली झाल्यानंतर ही फक्त तडजोडी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसे लुबाडण्याचा कायम प्रयत्नात असताना. धुमाळच्या या कर्मकांडाच्या  बातम्याही माध्यमांतून प्रसिद्ध होत असूनही  वरिष्ठ अधिकारी सतीश धुमाळच्या करणामांकडे सोईस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहेत.  दिलीप ननावरे यांच्या प्रकरणात धुमाळने कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी  घेऊन बेकायदेशीर काम करत  आहे.  सतीश धुमाळवर कारवाई कोणाचा जीव गेलेवरच कारवाई होणार का असा प्रश्न  जनमानसात उमटताना दिसत आहे.

esahas.com

भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला

पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

esahas.com

स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

esahas.com

पुणे बंगलोर महामार्गावर उभ्या मालट्रकला इनोव्हाची धडक : दोन महिला ठार, चार जखमी

पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.

esahas.com

कराडात महामार्ग जाम : पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी

शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.

esahas.com

महामार्गाखालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा

भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींनी केल्या.

esahas.com

वडाचे झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

पुणे- बंगळूर  महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावानजीक आज दुपारी वडाचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली.

esahas.com

‘हायवे मृत्युंजय दूत’ अभियानाचा भुईंज महामार्ग पोलीस केंद्रातर्फे शुभारंभ

महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दूत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज यांच्या मार्फत जोशीविहीर (ता. वाई) येथील साईविश्‍व मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.