herearesomecommonmistakesyoumakewhenexercisingathome

esahas.com

घरच्या घरी व्यायाम करताना तुम्हीही हमखास करता 'या' चुका, जाणून घ्या

व्यायाम करताना होणाऱ्या चुकांमुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. सध्याच्या धावपळीच्या जगात फीट राहणं खूप गरजेचं आहे. मात्र यासाठी प्रत्येकाकडे व्यायामासाठी तसंच जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ असेलच असं नाही. त्यामुळे अशा बऱ्याच व्यक्ती आहे जे ट्रेनरशिवाय घरी व्यायाम करतात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही असं करत असताना तुमच्याकडून काही चुका होत आहेत. अशा चुकांमुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं.