givetheopportunitytoworkinthedelegationgoingtoukraine

esahas.com

युक्रेनमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळात काम करण्याची संधी द्या

शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.