जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली.
आनेवाडी टोलनाक्याच्या हद्दीत महामार्गाच्या लगत तीन पानी काला पिला नावाचा जुगार खेळवून ट्रक चालकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला भुईंज पोलिसांनी मध्यरात्री सव्वा एक वाजता ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात युवकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व कुरिअर पार्सल लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई 17 रोजी नेर तलावाजवळ करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून आठ काडतूस, चार पिस्टल, एक मॅक्झिन, तीन मोबाईल, दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथील प्रतापगंज पेठेत कौतेय कॉम्प्लेक्स समोर रस्त्यावर एका मुलाच्या खुनाचा प्रयत्न करून गर्दी व मारामारी केल्याप्रकरणी बकासुर गँगच्या आठ ते दहा जणांच्या टोळीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाई, ता. वाई येथे दुचाकी जाळून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाई पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. विजय मच्छिंद्र धोत्रे, वय २१, समीर पठाण, वय १९ दोघेही रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई अशी दोघांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये समावेश आहे.
मोबाइल शॉपीची भिंत फोडून आतील साहित्याची चोरी करणारी तीन जणांची टोळी जेरबंद करण्यात कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कुख्यात गुंड गज्या मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सातारा जिल्ह्यातील वाई येथून ताब्यात घेतले.
बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची उकल बोरगाव पोलीस ठाण्याने 24 तासात करून तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला उंब्रज पोलीसांनी पकडले असून सतर्क रात्रगस्तमुळे पाचजणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संशयित दरोडेखोराकडून लाखोचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड व टिमचे कौतुक होत आहे.
तडीपारी आदेशाचा भंग करुन साताऱ्यातच राहून आणखी दुचाकी चोऱ्याही करणाऱ्या एका तडीपार गुंडासह चोरीत त्याचा साथीदार असलेल्या एकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात करण्यात यश मिळवले आहे.
टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते.
सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासूर गँगमधील सात जणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून पंचवीशीच्या आतील युवक आहेत.
सातारा जिल्ह्यात डोकेदुखी ठरलेली परराज्यातील बनावट सोने विकणाऱ्या भामट्यांच्या टोळीला कराड पोलिसांनी गजाआड केले. कोणताही पुरावा नसताना केवळ भामट्यांचा अंदाज आल्याने, टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून बारापेक्षाही जास्त फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले.
इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.
दरोडय़ाचा तयारीत असणाऱ्या टोळीकडुन लोणंद पोलीसांनी फलटण व बारामती तालुक्यातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या परप्रांतियांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण रोख रक्कम, इतर ऐवज व मोटरसायकल आणि हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीनाथ हरिभाऊ कदम यांनी फिर्याद दिली आहे.
गृहमंत्री दौऱ्यावर असताना कारागृहातून पळून गेलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर वडूज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. या टोळीवर औंध, उंब्रज, पुणे, बीड, नगर जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोरी, मारामारी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाच टोळीवर एका आठवड्यात मोकांतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.
पुण्याकडून सांगोला जाणाऱ्या 22 चाकी ट्रेलरचा फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून चाळीस ते पन्नास फूट खाली कोसळून करप्पा रेवन गावडे याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड, सातारा, उंब्रज व पाटण या चार ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चार टोळ्यांमधील तब्बल 23 जणांना तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतलेला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
लोणंद, ता. फलटण परिसरातील पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा, बारामती, पुरंदर, भोर व माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे हद्दपार आदेशांचे शतक पूर्ण केले आहे.
फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर घेतलेल्या ट्रक्सचे हप्ते थकल्यानंतर, ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून, ट्रक्स घेऊन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सातारा शहर पोलीसांनी केला आहे. या टोळीने महराष्ट्र, गुजरातमध्ये अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील सहा जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ही कारवाई केली असून नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
जकीनपेठ, ता. भुदरगड येथील म्हातारीच्या पठारावर बंद स्थितीत असलेल्या पवनचक्कीचे ६८ लाखांचे साहित्य चोरून नेत असताना नऊ जणांना पकडले. त्यांच्याकडील वाहने,मोबाइल असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाई तालुक्यातील वेळे येथे भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांना भुईंज पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. काही तासांतच ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रिक्षा भाड्याने करण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकास कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत नेवून रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटणार्या टोळीचा शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला. दरम्यान, हे कृत्य तडीपार गुंडाने केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
समाजविघातक कृत्य करणार्या कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांमधील 13 जणांना आज तडीपार आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे.
कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित एक महिन्यापासून फरार होते. संशयित तिघांकडून आठ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्या करुन धुडगूस घालणार्या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड जि.सातारा व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुरिअर डिलिव्हरी बॉयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाज
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.