ganeshjayanticelebrationsinadevotionalatmosphereinsataradistrict

esahas.com

सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी

जिल्ह्यासह सातारा शहरात शुक्रवारी गणेश जयंती सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात व पारंपारिक पद्धतीने पार पडला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भाविकांनी यंदा सामाईक अंतराचे पालन करत गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.