fundofrs.4.5crorefromamrutyojanaforgodolilake

esahas.com

गोडोली तळ्यासाठी अमृत योजनेतून तब्बल साडेचार कोटींचा निधी

सातारा शहराच्या पूर्वेला गोडोली परिसरात असणाऱ्या गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून तब्बल साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निधीमधून तलावासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.