formermlaprabhakarghargegrantedbailbysupremecourt

esahas.com

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजुर

पडळ, ता. खटाव येथील साखर कारखान्यावर ११ मार्च २०२१ रोजी झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढून ती जिंकली होती.