खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सातारा शहराच्या मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक तरस दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. कॉलनी मधील कुरेशी वस्तीमध्ये या तरसाने दाट झुडपाचा आश्रय घेतल्याने वनविभागाला त्याला ताब्यात घेताना बऱ्याच प्रयत्नांची शर्थ करावी लागली.
परळी खोऱ्यातील सावली ता. सातारा गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या १६ जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळील मांस जप्त करत वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे आपल्या शेताची राखण करत असताना त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार झाले. प्रचलित शासन नियमाप्रमाणे लक्ष्मण बाबुराव माने यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांच्या हस्ते देण्यात आला.
कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी वाई ते व्याहळी रस्त्याने गस्त करीत असताना पसरणी गावच्या हद्दीत आळेवाट या ठिकाणी टेम्पो क.एम एच -०८८०७४१ टेम्पोसह जळाऊ लाकडे वन खात्याने ताब्यात घेतली.
पावसाळ्यात रंगबेरंगी फुलांची उधळण करत असलेले कास पठार जागतिक वारसा स्थळ असून आता विद्यमान उपवन संरक्षक महादेव यांच्या संकल्पनेतून कासच्या जंगलात नाईट सफारी सुरु करण्यात येणार असून दि. 19 रोजी या नाईट सफारीला सुरवात होणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या निर्णयाला निसर्गप्रेमी सातारकरांमधून विरोध होवू लागला आहे.
जागतिक वन दिनानिमित्त सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता रात्रीची जंगल सफर करण्याचा आनंद लुटता येणार आहे. सातारा जिल्हा वन विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या सफरीच्या निमित्ताने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्रगस्त घालता येईल, अशी माहिती जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
वनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनने सातारा नगरपालिका ते पवई नाका येथे विनंती पायी मोर्चा काढुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. उद्या गुरुवार दि. ३ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युनियनने दिली.
वडगाव, ता. सातारा येथे वनवणवा प्रतिबंध सप्ताह अंतर्गत आज प्रचार, प्रसिद्धी करून वनवणवा प्रतिबंधक उपाय म्हणून सातारा तालुका वन विभागाच्या पुढाकाराने माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली. यावेळी अनेकांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली.
किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.
किरपे, ता. कराड येथे गुरुवारी सायंकाळी राज धनंजय देवकर या लहान चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने आज शुक्रवारी त्याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज वनविभागाने हकालपट्टी केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
पळसावडे, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत काम करत असणाऱ्या गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या तेथीलच माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा रामचंद्र जानकर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरात पळसवडे येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पळसवडेच्या वनसमितीचे अध्यक्ष असलेल्या माजी सरपंचाने वनविभागातील महिला वनरक्षकालाच गंभीर स्वरुपाची मारहाण केली. या घटनेत ती महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून ती गर्भवती असताना देखील तिला मारहाण करणार्या माजी सरपंचाविषयी समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुष्काळी भागात नैसर्गिक वरदान लाभलेल्या येरळवाडी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पर्यटक व अभ्यासकांची वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यास वाव असला तरी स्थानिक वन विभागाचा दुर्लक्षितपणा व अभाव यामुळे खटाव तालुक्यातील वन विभागाच संशयाच्या पिंजऱ्यात अडकला आहे.त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी येरळवाडी सह खटाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाने कारवाई करत विनापास, विनापरवाना सागवान, रायवळ लाकडांची वाहतुक करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर- ट्रॉली ताब्यात घेतली. या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर-ट्रॉली असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सरत्या वर्षातील वनविभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
३१ डिसेंबर रोजी वनविभागाच्या क्षेत्रात कोणी पार्टी करताना आढळून आल्यास घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिला. या दिवशी विशेषता यवतेश्वर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय ३८ वर्ष) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना शनिवार दि. २० रोजी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.
कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का?
सातारा- कास मार्गावर आज सायंकाळी उशिरा अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे एक एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना मौलिक सूचना केल्या.
‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पिरेवाडीच्या युवकावरच आता वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहे. आठ दिवस उलटल्यानंतर वन विभागाला जाग कशी आली असा प्रश्न उपस्थित होत आहे
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांना कोरोना साथीच्या काळात राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय व जीपीएसने केलेल्या मोजणीचा संदर्भ देत तालुक्यातील भूमिपुत्रांना बांधकामे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने हैराण नागरिकांना वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर यांनी नोटिसा बजावून नेमकी वेळ साधल्याने भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.