forcedrobberybystabbingawomanintheneck

esahas.com

महिलेच्या गळ्याला चाकू लावून जबरी चोरी

आदर्की बुद्रुक, ता. फलटण येथील एका घरात महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी असे दीड तोळे सोने घेऊन चोरट्याने पलायन केले. याबाबतची फिर्याद सौ. रंजना संपत बर्गे वय ४५ यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.