firebyshortcircuitinranand

esahas.com

राणंदमध्ये शॉर्ट सर्किटने आग; दोन घरे जळून खाक

माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.