filedahundredobjectionsonzpswardstructure

esahas.com

झेडपी च्या प्रभाग रचनेवर शंभर हरकती दाखल

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. गट, गणांच्या कच्च्या प्रभाग रचनेचर हरकती, आक्षेपांवर सुनावणी होऊन ३३ ठिकाणी अंशत: बदल करुन पुन्हा अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात आली. ही अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ७३ गट व १४६ गण असणार आहेत.