fightbetweenwomenteachersinschool:bothteacherssuspended

esahas.com

महिला शिक्षिकांमध्ये शाळेतच मारामारी : दोन्ही शिक्षिका निलंबित

मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.