fiftythousandrupeeswillbegiventothenextofkinofthepersonwhodiedbykovid19

esahas.com

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये

मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार)  इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.