farmersshouldturntoagroprocessingindustry:unionministerofstatepralhadsinghpatel

esahas.com

शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल

शेतकऱ्यांनी पिकवलेला फळे, भाजीपाला हा काही कालमर्यादे पुरताच टिकून राहतो. काल मर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल हा खराब होतो व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. यामुळे शेतकऱ्यांना, देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.