साताऱ्याच्या पत्रकारितेत स्वत:चे अनोखे वलय निर्माण केलेल्या पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी दुपारी निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी या 'अक्षरक्रांती', 'पत्रयोद्ध्या'ला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, रक्षाविसर्जन विधी सोमवारी (दि. ३१) सकाळी ९.३० वाजता चिंचेवाडी येथे होणार आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!