frpmeetinginsatarafailed

esahas.com

साताऱ्यात एफआरपीची बैठक निष्फळ

एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यासाठी विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या बरोबर बुधवारी नियोजन भवन येथे बैठक झाली. मात्र, यामध्ये कोणताही ठोस निर्णय झाला नाही, म्हणून ऐन दिवाळीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच कारखान्यांचे संचालक यांच्या दारात बसून गनिमी काव्याने सर्व संघटना एकत्र येवून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.