exciseaction

esahas.com

उत्पादन शुल्क च्या भरारी पथकाची जुळेवाडी येथे कारवाई

जुळेवाडी, ता. कराड येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग साताराच्या भरारी पथकाने धाड मारून बनावट दारू तयार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट देशी दारूचा साठा व एक चारचाकी वाहनाचा 1 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.