सातारा पालिकेचे राज्य संवर्गातील कर्मचारी बदलीच्या प्रक्रियेमध्ये असून या संदर्भातील बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील विनंती बदल्यांचे अर्ज नगर विकास विभागाने सरळसेवा पोर्टलच्या माध्यमातून भरून घेतले आहेत. गेले तीन वर्ष सातारा नगरपालिकेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऐन निवडणुकीच्या काळात बदल्या होणार असल्याने दैनंदिन कामे ठप्प होणार आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!