duetoheavyrainlargecracksfellonthemountainatdandeghar

esahas.com

अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा; शाळेच्या इमारतीला धोका

दांडेघर, ता. महाबळेश्वर येथील डोंगराला अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगराशेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.