नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
र्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दि.15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांदाटी खोऱ्यातील गावांमध्ये अभयारण्याचे असलेल्या गट नंबरची मोजणी करून नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे रासाठी, गोकुळ व शिवंदेश यांच्यावर पुनर्वसनाचा शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार याप्रश्नी प्रधान सचिव पुनर्वसन यांनी २२ रोजी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे २१ मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.