भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तत्पूर्वी चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उदयनराजेंनी अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा पालिका शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा. उदयनराजे भोसले यांनी तसेच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने मान्यवरांनी अभिवादन केले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतीक’ असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा ‘समतादिन’ म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केलाय. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा सातार्याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरंतन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जाव