donotaccidentallyeatmangoormangojuicewith3foodsthatcanbeharmfultoskinandhealth

esahas.com

आंबा किंवा आंब्याचा रस यासोबत चुकूनही खाऊ नका 3 पदार्थ, त्वचा आणि आरोग्यासाठी ठरेल घातक

सध्या बाजारात आंबा आला आहे. पण अजूनही योग्य प्रमाणात आंबा न आल्याने आंब्याचे भाव चढेच आहेत. त्यामुळे अगदी पोटभर यथेच्छ आमरस खाणे आणि आंब्यांचा आस्वाद (eating mango) घेणे बऱ्याच घरांमध्ये झालेले नाही. तिथून मग खऱ्या अर्थाने आमरसाचा हंगाम सुरू होतो.. यथेच्छ, भरपूर आमरस खा. पण त्यासोबतच आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. कारण चुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचेही नुकसान होऊ शकते.