districtbankelectionscrutinyrejectedtheapplicationsofboth

esahas.com

सातारा जिल्हा बँक निवडणूक : कहीं खुशी, कहीं गम

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.

esahas.com

सातारा जिल्हा बँक निवडणूकः राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा

तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.

esahas.com

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा-फलटण राजघराण्यांमध्ये साखरपेरणी

राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.

esahas.com

जिल्हा बँक निवडणूक छाननीत दोघांचे अर्ज बाद

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दीही झाली होती. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

esahas.com

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दीपक पवार व शंकर माळवदे यांचे अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदचे सदस्य दीपक पवार यांनी प्राथमिक कृषी पथपुरवठा विकास सेवा सोसायटी संस्था जावलीमधून दोन अर्ज दाखल केले आहेत. इतर दोन जणांनीही आज अर्ज भरले असून, बुधवारी 3 वाजेपर्यंत 165 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.

esahas.com

सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा वाजला बिगुल

सातारा जिल्ह्यातील प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होणार आहे. दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.