distributionofkrantijyotisavitrimaiphulesangharshgauravawardon9thinsatara

esahas.com

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष गौरव पुरस्काराचे 9 रोजी साताऱ्यात वितरण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.