dischargeofwaterfromfivedamsinthedistricthasstarted

esahas.com

जिल्ह्यातील पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम-बलकवडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.