dirtreignsinmahabaleshwar

esahas.com

ऐन दिवाळीच्या हंगामात महाबळेश्‍वरमध्ये घाणीचे साम्राज्य

येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्‍वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्‍वर म्हणवून घेणार्‍या महाबळेश्‍वर पालिका मुख्याधिकार्‍यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.