सातारच्या माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांची मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना सातारा जिल्ह्यावर कायमच अन्याय झालेला आहे. गेली अनेक दशके सातारा जिल्ह्याला या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. आता या मतदारसंघासाठी सातार्यातील उमेदवार द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!