Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला.
फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.
वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी
कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गालगत बाजूला घेतली. त्याचवेळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.
श्रावणातील पहिल्या शनिवारी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जांब, ता. कोरेगाव परिसरात असणाऱ्या जरंडेश्वर डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान सातारा शहर व परिसरातही मारुती मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले याठिकाणी सध्या कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज होळी पौर्णिमा व गुरुवार असल्याने मोठ्या प्रमाणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांना लापशीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.